मराठीसृष्टीची चॅनेल्स

मराठीसृष्टी  पोर्टलचे  वेगवेगळे अनेक भाग आहेत. या भागांची थोडक्यात ओळख.


लेखसंग्रह –

विविध विषयावरील हजारो लेखांचा हा संग्रह.  मराठी कदाचित सर्वात मोठा संग्रह असावा. अनेक प्रतिथयश तसेच नवोदित लेखक सुद्धा येथे येऊन आपल्या वाचकांना आनंद देत असतात.


मराठी व्यक्तीकोश

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या आणि सध्याही असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींची  आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा मराठी व्यक्ती कोश. यामध्ये  प्रकाशात आलेल्या  व्यक्तींसोबतच अनेक अशा व्यक्तींचा समावेश आहे की जे प्रसिद्धीपराङमुख आहेत.


महासिटीज

महाराष्ट्र,  भारत आणि जगातील इतर अनेक देशातील विविध  वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचा घेतलेला हा मागोवा. आपल्याला अनेकदा एखाद्या जागेचे नाव माहीत असते मात्र ते का पडले ते माहीत नसते.  एखाद्या जागेचे महत्वही आपल्याला माहीत नसते. यावर प्रकाश टाकणारा हा विभाग.


खाद्ययात्रा

महाराष्ट्रासह इतर देशातील आणि जगभरातील विविध खाद्य संस्कृतींची ओळख करून देणारा हा विभाग.  इथे वेगवेगळ्या पाककृती आपल्याला वाचायला मिळतील.


मराठी पुस्तके

वेगळ्या विषयावरील मराठी पुस्तकांची माहिती करून देणारा हा विभाग.  काही पुस्तके येथे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. अतिशय अल्प खर्चामध्ये पुस्तकाचं प्रमोशन जगभरात करण्यासाठी अनेक प्रकाशक आणि लेखक या मंत्राचा उपयोग करत आहेत.


आडनावांच्या नवलकथा

मराठीमध्ये तब्बल पन्नास हजारपेक्षा जास्त आडनावं आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?  ह्या आडनावांच्या  मागच्या सुरस कथांसहित या आडनावांचे संकलन या विभागात केले आहे.  हा विभाग सध्या आकार घेत आहे.


ब्रॅंडनामा

मराठी माणसाने सुरू केलेले आणि मोठे केलेले अनेक ब्रँडस आहेत.  मात्र यातील बऱ्याच ब्रँडची जनसामान्यांना माहिती नाही. हीच माहिती करून  देणारा हा विभाग. यासोबत या  विभागांमध्ये देशभरातील आणि जगभरातील लोकप्रिय ब्रँड सुद्धा माहिती दिलेली आहे. हा विभाग सध्या आकार घेत आहे.


मराठी अलंकार

विस्मरणात गेलेल्या मराठी अलंकारांची माहिती या विभागात संकलित केली जात आहे.


मराठीसृष्टी टॉक्स (Youtube Channel) 

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आणि त्यांची भाषणे यांचा संग्रह असलेला हा विभाग.