बार्बाडोस

बार्बाडोस हा पूर्व कॅरिबियन समुद्रातील द्वीप-देश आहे. या देशाच्या उत्तरेला वेस्ट इंडिज ची बेट आहेत.ब्रिजटाउन ही बार्बाडोस ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रिटनने १६२५ मध्ये या बेटाचा शोध लावला. अंजीराच्या झाडासारखे बेट असे […]

फ्रान्स

फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरीस ही फ्रांसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे. फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी […]

फिनलंड

फिनलंड हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही […]

झांबिया

झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची […]

बर्किना फासो

बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे […]

बल्गेरिया

बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत […]

बोत्स्वाना

बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने […]

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. राजधानी व […]

भूतान

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू […]

बेलीझ

बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे. इ.स. […]

1 11 12 13 14 15 19