अंगमली हे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. एर्नाकुलमपासून ३३ किलोमीटर उत्तरेस हे शहर वसलेले असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ते वसलेले आहे. १९५२ मध्ये येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली, तर पुढे १९७८ मध्ये नगरपालिका स्थापन झाली. अंगमली हा केरळ विधानसभेचा मतदारसंघ आहे.
वेगाने वाढणारे शहर
अंगमली हे केरळमधील एक वेगाने वाढणारे शहर आहे. हत्तींना प्रशिक्षण देणारे कोडनाड येथील केंद्र या शहरापासून जवळ असून, तेथील छोटे प्राणीसंग्रहालय प्रसिद्ध आहे. तसेच अंगमली येथील ९ व्या शतकात बांधलेले कालिमाता मंदिरही प्रसिद्ध आहे.
Leave a Reply