भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे. या नगरपालिकेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव २०११ साली येथे मोठ्या प्रमाणात साजरा झाला. येथे सुंदर समुद्रकिनारा असून अनेक पर्यटक येथे भेट देतात.
नरसिंह मंदिर प्रसिद्ध
स्वातंत्र्यपूर्व काळात भिमुनीपट्टणम येथे डचांची वखार होती. कालांतराने ईस्ट इंडिया कंपनीकडेही हे शहर होते. १४व्या शतकात बांधलेले येथील नरसिंह मंदिर प्रसिद्ध असून गोस्थनी नदी बंगालच्या उपसागराला जेथे मिळते, ते ठिकाणही प्रेक्षणीय आहे.
Leave a Reply