हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अनेक छोटे उद्योग असून त्यातील काही महत्त्वाचे :
हिंगोली येथील मेंढीच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग, कातडी कमावून त्यापासून वस्तू तयार करण्याचा उद्योग व त्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र, सिंचनासाठी लागणार्या नळ्यांचा (पाईप्सचा) कारखाना, कळमनुरी येथील हातमाग उद्योग, वसमत तालुक्यातील रेशीम किडे जोपासण्याचा उद्योग, प्लायवूड तयार करण्याचा उद्योग, औंढा-नागनाथ येथील जिनिंग-प्रेसिंग व्यवसाय चालतात. त्याचप्रममाणे गूळ तयार करणे, पशु व कुक्कुटपालन या सारखे अनेक शेतीप्रधान व्यवसायही जिल्ह्यात सुरु आहेत.
Leave a Reply