जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. येथील मिरज हे ठिकाण तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. सतार, तानपुरा (तंबोरा), सारंगी, वीणा या वाद्यांना देशभरातून मागणी असते.
Leave a Reply