कॉमेट मॉथ किंवा मादागास्कर मुन मॉथ हा आफ्रिका खंडात आढळणारा पतंग जगातील अत्यंत सुंदर पतंगांपैकी एक मानला जातो. त्याचा मूळ अधिवास म्हणजे मादागास्करमधील पर्जन्यवने.
त्याला लाल रंगाची मोठी शेपटी असते. तिची लांबी १५ सेंटिमीटर पर्यंत असू शकते. या पतंगातील नराच्या पंखांचा पसारा तब्बल वीस सेंटीमीटर असतो. पतंगाची मादी एकावेळी १२० ते १७० अंडी घालते. त्यातून दोन महिन्यांनंतर पतंगाच्या अळ्या बाहेर येतात. या अळीच्या कोषांना अनेक छिद्रे असतात. त्यामुळे त्या पाण्यावर सहज तरंगू शकतात.
प्रौढ पतंगाचे आयुष्यमान फक्त चार-पाच दिवस असते .
Leave a Reply