नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

गुरु गोविंदसिंहजी – त्यांचे या जिल्ह्यातील वास्तव्य व समाधी हीच आज नांदेडची मुख्य ओळख आहे.

कवी वामन पंडित – मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातलेच.

ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – वारकरी संप्रदायाची पताका आयुष्यभर आपल्या खांद्यावर घेऊन निष्ठेने व सातत्याने प्रवास करणारे ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर हे याच जिल्ह्यातील देगलूरचे. आपल्या अमोघ वाणीने यांनी संत साहित्याचा अर्थ अवघ्या महाराष्ट्रासमोर उलगडून दाखवला.

स्व. शंकरराव चव्हाण – कडक शिस्तीचे उत्कृष्ट प्रशासक म्हणून ख्याती असलेले स्व. शंकरराव चव्हाण यांचा नांदेडच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*