संत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते. त्याचबरोबर श्री. अण्णासाहेब गव्हाणे हे शेतकरी कामगार पक्षाचे महासचिव (जनरल सेक्रेटरी) होते आणि श्री. नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोळी गावी झाला,हे नामवंत समाजसेवक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ही आहेत. मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे ग्रामीण विकासाचे कार्य करत असून तेथे त्यांनी महात्मा गांधींच्या नावे विद्यापीठ स्थापन केले आहे.
Leave a Reply