कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो. कोल्हापुरी मराठी बोली विशिष्ट हेल काढून बोलली जाते. मांसाहार आवडणार्या खवय्यांसाठी कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
तसेच कोल्हापुरी मिसळ, रस्त्यावरच उभ्या असलेल्या म्हशींचे जागेवरच काढून दिलेले निरसं दूध, पैलवानांची थंडाई यासाठीही कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातही वाटा वाढतो आहे. प्रामुख्याने कुस्ती हा जिल्ह्यातील महत्त्वाचा खेळ म्हणता येईल. कोल्हापुरातील वैशिष्ट्यपूर्ण तालीम संस्कृती व येथील अनेक मल्लपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply