वाशिम शहर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम जिल्हा वस्तुतः अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अलीकडेच नव्याने निर्माण करण्यात आला. विदर्भातील या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे ५० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. सुमारे ८२५ प्राथमिक शाळा, २००० माध्यमिक शाळा व ५ तंत्रनिकेतने या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात शैक्षणिक कार्य चालते.
nice app