हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस असून,हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.१ मे १९९९ रोजी हिंगोली,”जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला”.या जिल्ह्यात औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके समाविष्ट आहेत. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ कि.मी.२ आहे तर एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे.
हिंगोली हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागातील (दक्षिण-पूर्व कोपर्यातील) जिल्हा आहे. हिंगोलीच्या उत्तरेला वाशिम, पूर्वेला यवतमाळ व नांदेड; दक्षिणेला परभणी व नांदेड,पश्र्चिमेला जालना व परभणी आणि वायव्येला बुलढाणा हे जिल्हे आहेत.
राज्याच्या एकूण भू-भागापैकी जवळजवळ १.५७% भू-भाग या जिल्ह्याच्या वाट्याला आला आहे.हिंगोली जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग वगळता बराचसा भाग डोंगराळ असून जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याची डोंगररांग पसरलेली आहे.या डोंगररांगांना हिंगोली टेकड्या असे म्हटले जाते. जिल्ह्याचा दक्षिण भाग हा मैदानी प्रदेशाचा असून या भागातून पैनगंगा, पूर्णा, आसना व कयाधू या महत्त्वाच्या नद्या वाहतात.
पैनगंगा ही नदी सेनगाव व कळमनुरी तालुक्यातून वाहते. पूर्णा ह्या महत्त्वाच्या नदीच्या पाण्याचा लाभ शेतीस व्हावा यासाठी येथे १९५७ मध्ये येलदरी धरण प्रकल्प मंजूर करण्यात आला. या धरणाची ८०९.२६३ टी. एम. सी इतके पाणी साठविण्याची क्षमता आहे. शिवाय १५००० किलोवॅट क्षमतेचे जिल्ह्यातील एकमेव जलविद्युत केंद्र याच धरणावर आहे.
जिल्ह्यातील दुसरे प्रमुख धरण म्हणजे औंढा-नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण होय. याचा वापर फक्त जलसिंचनासाठी केला जातो. अप्पर पैनगंगा धरणाचा कळमनुरी तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी फायदा होतो.
Sawantgangadhar1234@gmail.com