नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, मांजरा, मान्याद व पेनगंगा या आहेत. नांदेड महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. लातूर, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि निजामाबाद हा आंध्रप्रदेशातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
Leave a Reply