कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात.

कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते.

लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.

1 Comment on कोकणचा मेवा – फणस

  1. कोकणी माणसे फणसासारखी बाहेरुन काटेरी पण स्वभावाने गोड असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.


*