कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो.

भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*