महे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे. महे शहराच्या तीन बाजूस कन्नूर जिल्ह्याचा भाग असून, एका बाजूस कलिकत जिल्ह्याचा भाग येतो. रस्ते मार्गाने हे शहर देशातील विविध शहरांशी जोडलेले आहे.
पूर्वीची फ्रेंच वसाहत
सध्या जिथे महे शहर वसलेले आहे तिथे पूर्वी फ्रेंचांची वसाहत होती. नंतर या वसाहतीचेंच शहरात रुपांतर झाले. पुडुचेरी विधानसभेचा महे हा एक मतदारसंघ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ४१,८१६ इतकी इथली लोकसंख्या असून, ९७.८७ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. येथे मल्ल्याळी भाषा बोलतात.
Leave a Reply