पलक्कड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. लोकसंख्येचा विचार करता केरळमधील हे सातवे मोठे शहर असून, भौगोलिकदृष्ट्या ते तामिळनाडू राज्याला जवळचे आहे. त्यामुळे येथे तमिळी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असली तरी मल्ल्याळी भाषाही बोलली जाते. या शहरातील किल्ला प्रेक्षणीय आहे.
‘गेट वे ऑफ केरला’
तामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते. या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून, देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या गाड्या येथून पुढे जातात.
Leave a Reply