भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. येथील सिध्दगिरी म्युझियम हे पुरातन काळातील संस्कृती, सामाजिक जीवनाचे दर्शन घडविणारे प्रसिध्द स्थळ आहे. श्री काडसिध्देश्वर यांनी हे म्युझियम उभारले आहे. यातील बहुतांश मूर्ती अतिशय सजीव दिसत असून भारतातील काही महत्वाच्या शोधासोबतच संस्कृतीची आजच्या पिढीला माहिती करून देण्यासाठी या म्युझियमची वाटचाल सुरू आहे.
“भारतीय ग्रामीण संस्कृती’ हा या संग्रहालयाचा मुख्य गाभा आहे. ग्रामीण भारत कशा समृद्ध होता याचे जिवंत दर्शन या प्रकल्पातून घडवले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भारतीय ग्रामीण संस्कृतीची नव्या पिढीला ओळख व्हावी, माहिती व्हावी, तिची जपणूक आणि संवर्धन करता यावे, निर्मळ जल, निर्भेळ अन्न आणि निराआलस्य कष्ट तसेच स्वावलंबी सहज सुंदर ग्रामीण, जीवनांवर प्रीती जडावी या उदात्त हेतूने हा प्रकल्प साकारला आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिलाच उपक्रम आहे.
Leave a Reply