
जिल्ह्यात सातारा, कर्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे. शिरोळे येथील कागद गिरण्या हे या जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग आहेत. महाबळेश्र्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र असून येथील शुद्ध मध प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उद्योग केला जातो. सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादन लक्षणीय असून साखर कारखान्यांची संख्या देखील मोठी आहे.
Leave a Reply