राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 – हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 – गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो. उस्मानाबाद शहर रेल्वेमार्गाने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड,परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. उस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे.
उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते. उस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत.
Leave a Reply