सौ.अंजली मनोज मुनेश्वर

माझे मत…
” #साहित्याची रचना करणारा #साहित्यिक “.
साहित्यिक हा कधीहि छोटा-मोठा नसतो.साहित्यिक हा कधीहि प्रसिद्धीसाठी हापापलेला नसतो. वाचकांचा प्रतिसादच त्याच्यासाठी अनमोल असतो.कारण ” #साहित्य रचना” ही त्यास लाभलेली एक देणगी असते.
ठरवुन , विचार करून कधीहि साहित्य निर्मीती करता येत नाहि.
आज आपण पाहतोय की सामान्य नागरिकांपासुन ते विषय तज्ञापर्यत सारेचजण लेखन करत आहेत.येथे प्रत्येकाच्या लेखनाची शैली भिन्न आहे. समुहात विषय सारखाच जरी असला तरी कल्पकता भिन्न आहे.म्हणुन
प्रत्येकाच्या लेखनास आपण ” साहित्य” म्हणु शकतो का? हा प्रश्न उद्भवतोय.
१)#साहित्य ::
साहित्य म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर नेमक्या शब्दात देणं कठीणंच.
साहित्य हा शब्दच ईतका व्यापक आहे की,त्यास आपण ठराविक शब्दांच्या चौकटित शब्दबद्ध करूच शकत नाहि.तरिहि , साहित्य म्हणजे ‘ समाज दर्पण’होय.
#कवीन्द्र रवीन्द्र म्हणतात,” सहितस्य भावः साहित्यम् “.
#सहित भाव ज्या रचनेत आहे, ते साहित्य होय.
#कवीन्द्र रवीन्द्र हे असे ही म्हणतात की,” सहित या शब्दापासुनच साहित्य या शब्दाची निर्मिती झाली.”
साहित्य हे लिखित व वाचिक स्वरूपात आढळते.आदिवासी साहित्यास आद्यसाहित्य असे म्हणतात.
७व्या, ८व्या दशकापुर्वी साहित्यास ” काव्य” असे संबोधले जाई.#आचार्य भामहा म्हणतात,” शब्दार्थो सहिंतौं काव्यम् “.कालांतराने काव्य हा शब्द फक्त कवितांसाठी वापरण्यात येऊ लागला.
२)#लेखन ::
साहित्यिक ‘ साहित्य’ लिहितो.त्याची रचना करतो.रचना करतांना त्याचा संवाद मनाशी होतो.त्याच्या
आजुबाजुस घडणार्या घटनांचा त्याच्या लेखणीवर परिणाम होतो.त्याचे शब्द कागदावर उतरतात.कधी ते प्रेमात #फुलपाखरासारखे या फुलावरून त्या फुलावर बागडंतअसतात, तर कधी विरहात रडतातही.कधी #पावसाच्या सरीत बेधुंद होऊन नाचतातहि.तर कधी समाजातील मन सुन्न करणार्या घटनांवर ,विद्रोह्यांवर
तलवारी सारखे बरसतातहि.शब्दातील #चपराक ईतकी भारी असते की, समाज पेटुन उठतोच.तेच शब्द कधी #अनाथांची माय होऊन ममतेची शाल होतात.
म्हणुनच साहित्यिकावर #निष्पक्ष लेखनाची जवाबदारी असते.त्याचा परीणाम हा देशावर , समाजावर खूप मोठा प्रभाव टाकतो.साहित्यिकाचे लेखन हे सभ्य असावे,समाज हिताचे असावे.जातीवादी,विभाजनवादी, विकृत लेखन असु नये.
३)#सामाजिक बांधिलकी::
सामाजिक बांधिलकी हे तत्व प्रमाण मानुन, समाजात सुधारणा घडवुन आणण्यासाठी चौफेर विचार करून , आपल्या लेखणीतुन समाज परिवर्तन घडवुन आणु शकतो. तोच ” #साहित्यिक” असतो.
४)#वाचकांसाठीचे लेखन::
वाचक वर्गाची नाळ ओळखुन, आपल्या रचनेतुन/साहित्यातुन नाविन्याचा अनुभव देतो.त्यांना खिळवुण ठेवतो.तोच खरा “#साहित्यिक”.
मग ह्या रचना रंगवितांना त्याने कोणत्या रसात लेखन केले? कोणत्या भाषेत लेखन केले?लेखन शुद्ध की अशुद्ध ?व्याकरण, अंलकार , वृत्ते यासार्या बाबी नगण्यच.कारण असे साहित्य #वाचकांच्या मनास स्पर्शुन गेलेले असते .अन्यथा ते फक्त शब्दांचा डोलाराच ठरेल.
५) #साहित्य आणी ओळींचे बंधन ::
आपले विचार वाचकांच्या मनात रूजविणे हे एक आव्हान असते.त्यासाठी प्रचंड अशी कल्पना, प्रतिभा,शब्दसाठा असणे आवश्यक असते.परंतु कधी कधी मनातले भाव सहज , साध्या सोप्या भाषेत मांडले तरहि ते वाचकांच्या मनापर्यत पोहचतात.त्यासाठी ओळींचे बंधन नसतेच.
कधी कधी खरा साहित्यिक आपल्या #दोनच ओळींतुन वाचकांच्या मनावर राज्य करतात.कारण त्यांचे शब्द सरळ मनास स्पर्श करतात.म्हणुनच वाचक ही दिलखुलासपणे त्यांना दाद देतात.आणी त्या साहित्यिकाचे वाचकांच्या मनात अढळ असे स्वतंत्र स्थान निर्माण होते.म्हणुनच #साहित्यिकाच्या साहित्याची मौलिकता ही त्याच्या लेखनाच्या लांबीवरून किंवा ओळींवरून ठरवता येत नाहि.
६)#साहित्याचे मुल्यमापन ::
एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याचे मुल्यमापन कसे करावे? त्यासाठी वाचक वर्ग आहे तेच खरे , निष्पक्ष मुल्यमापन करू शकतात. त्यांचा अभिप्राय मोठ्या मनाने स्विकारणारा #साहित्यिक असतो. तो #प्रशंसेने होरपळुन जात नाहि अन् #टिकांनी उदासहि होत नाहि.#वास्तव स्विकाता येणे आवश्यक आहे. तज्ञ, विचारवंत साहित्याचे समिक्षण करू शकतात.पण मुल्यमापन नाहि.
#संस्कृतमध्ये तर ‘ एक शब्दच ‘ वाड़मय आहे.संस्कृतमध्ये साहित्याची परिभाषाच….”#शब्दार्थो सहिंतौं काव्यम्”…अशी आहे.म्हणजे #शब्द आणी त्यांच्यातील भावपुर्ण #अर्थ साहित्यात महत्वाचे मानले आहेत.
संस्कृतमधील अंलकाराचे जनक #आचार्य कुतंक असे म्हणतात की,” शब्द व अर्थ यांच्यातील सौंदर्यासाठी लागलेली स्पर्धा म्हणजे साहित्य “.
म्हणुनच माझ्या मते ,”#शब्द ,अर्थ आणी भावना यांच्या त्रिवेणी संगमास जो कोणी शब्दबद्ध करू शकतो , तोच खरा साहित्यिक ..!!!!”

— सौ.अंजली मनोज मुनेश्वर
Mrs. Anjali Manoj Muneshwar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*