नमस्कार…. खरं तर…. वर्तमानपत्रातील पुरवण्यां मधील येणारे लेख, पशुपक्ष्यांची माहिती,, सिनेमांचे समीक्षण, यापासून निर्माण झालेली वाचनाची आवड……
.. अत्रे, पुल . वपु, गौरी देशपांडे, शांता शेळके, नेमाडे, दळवी,पासून ते, चेतन भगत, सुदिप नगरकर पर्यंत,, या आणि अश्या अनेक साहित्यिकांचे “विपुल साहित्य” वाचण्यात कधी आणि कशी वाढत आणि बदलत गेली,, काही समजलेच नाही….!!!!!
कविता, कथा, कादंबरी,ऐतिहासिक, आत्मचरित्र,प्रवासवर्णन, स्फुटलेखन, चारोळ्या, हायकू, अलक अश्या अनेक माध्यमातून,, साहित्यिक स्वत:ला व्यक्त करत असतो…
आयुष्यात येणारे, कितीतरी चढउतार, यशापयश, सुखदु:ख पचवण्याची “ताकद”, प्रत्येकाची वेगवेगळी असते,,
तत्सम,,
स्वतः तल्या “मी” ला प्रतिसाद देत,,
“जगण्यातील अनुभव “आणि आपल्या “भावविश्वातील कल्पनानुभव ” यांची उत्तम सरमिसळ करून,, एक एकसंध शब्दफुलांची, गुंफण करणारा असा असतो तो,,,, “साहित्यिक “!!!!!!!!
“…………………. शब्दांनी गारूड करून,, आपल्याच जिवनानुभवांना, लिखाणातील सुख दु:खाशी नाळ जुळवून देणारा,,, किमयागार म्हणजेच” साहित्यिक “!!!!!!!!
आणि, जे,, वाचणा-या प्रत्येकाला,, अलगद आपला शब्दा-शब्दातून,, पाना पानावरून….. आपल्या सोबत…. सहप्रवासी बनवून,, त्यांच्या वर्तमानालाही विसरायला लावते… फक्त शब्दांची किमया करून आपलंसं करते….. ते असते” “साहित्य”……….!!!!!!!!!!!
WhatsApp, Facebook च्या जमान्यात,, दिवस दिवस पुस्तकं वाचणारी, रात्रीतून कादंबरी संपूर्ण संपवणारी पिढी,, आता Facebook वर, आम्ही साहित्यिक, माझे पान असे दर्जेदार समूहातील लिखाण…….. Fb उघडून फक्त याला HAPPY birthday, त्याला happy anniversary करण्यापलीकडे वाचताना दिसतेच आहे की……..
आणि, जी मनाला थेट जाऊन भिडते , तीच कलाकृती “सर्वोत्तम”….!!!!!!!
आणि साक्षात् श्री गजाननाच्या हातातील लेखणीचे मूर्त स्वरूप……. आणि त्याच सर्व साक्षी परमेश्वरानीच बहाल केलेल्या चौशष्ट कलांपैकी एक असलेल्या” लिखाण कौशल्याला, न्याय देणारा असतो तो….. साहित्यिक…..!!!!!
तसंच,, लेखनकौशल्याला पारखणारा असतो तो “वाचकच…” …
त्या लिखाणाला उत्तम, सुमार, अत्युत्तम दर्जा….. देणारा तो वाचकच….!! पण, जेव्हा एखादी अभिव्यक्ती,, एखाद्या वाचकाच्या काळजाला हात घालून जाईल, तेव्हा तेवढ्याच ताकदीने,, तीच अभिव्यक्ती दुस-या वाचकाच्या मनाला स्पर्शून जाईलच,, असेही नाही,, म्हणजे साहित्याची “अभिरुची” देखील व्यक्तिसापेक्ष बदलतच जाणार!!!!!!!!!!
जसे सूर्य आणि पणती दोन्ही आपापल्या परीने तेजोमय ,, गुलाबपुष्प आणि रानफुलं दोन्ही आपापल्या जागी अतिव सुंदर…..त्यांची आपसात … तुलना होऊच शकत नाही….. त्या प्रमाणेच प्रत्येक लिहित्या हाताला, आपले स्वतंत्र अस्तित्व आहे,,!!
आणि म्हणूनच… जसा एखादा चित्रकार चित्र काढतो, कलाकार अभिनय करतो,, गायक गातो……….. तसाच लेखक लिहितो…….
आणि लिखाण करणारा,, तो प्रत्येक व्यक्ती “साहित्यिक च” असतो….. याबद्दल दुमत असू नये……
— डॉ. रश्मी यशवंत कुलकर्णी
Dr. Rashmi Yashwant Kulkarni
Leave a Reply