जाणा साहित्यिकांना रोजचे जीवन जगत असताना, त्यातील भावना, अध्यात्म, व्यवहारज्ञान, बौद्धिक विषय, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयांवर सर्जनशील, वैचारिक, काल्पनिक, मार्मिक वास्तववादी, अशा निरनीराळ्या स्वरुपात काही ना काही लिहिले जाते. त्या सर्व लिखाणांस साहित्य असे म्हणतात. आता हे साहित्य, विविध प्रकारांमधे लिहिले जाते. जसे कथा, कादंबरी, लेख, स्फुट, नाटक, चित्रपट, काव्य, गीतं इ इ.
आज आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे, तो आहे “साहित्यिक कोण?”. तर कोण आहे साहित्यिक? आपण जर साहित्यिकचा अर्थ पाहिला तर साहित्यिक म्हणजे…..
१. ते, जे साहित्याशी निगडीत आहे.
२. साहित्यिक म्हणजे तो, जो साहित्याचा पारखी आहे. थोडक्यात तो, जो साहित्य उत्तम प्रकारे जाणतो.
त्यामुळे साहित्याशी संबंधित असलेले सर्व आणि साहित्याचे उत्कृष्ट जाणकार, लेखक, हे सगळे साहित्यिक म्हणूनच गणले जातात.
मला असे वाटते की वर उल्लेखलेल्या प्रमाणे, विविध साहित्य प्रकार हाताळणारे, आणि लिहून आलेले वाचून त्यातला भाव, अर्थ ज्यांना कळतो, असे सर्व, साहित्यिकच आहेत.
दैनंदिन आयुष्य जगताना, ज्यांचा ज्यांचा कुठल्या न् कुठल्या, साहित्यप्रकाराशी संबंध येतो, ते साहित्यिक आहेत. एक लेख लिहिलेलाही साहित्यिक आणि चार लेख लिहिलेलाही साहित्यिकच. लिखाण प्रकाशित होऊन प्रसिद्ध असलेलेच फक्त साहित्यिक आहेत, हा एक निव्वळ गैरसमज आहे.
म्हणूनच आपल्या गृपला दिलेले “आम्ही साहित्यिक” हे शीर्षक अतीशय योग्य व समर्पक आहे. इथे साहित्याचे विविध प्रकार हाताळलेही जातात आणि त्याचे उत्तम जाणकार व दर्दीही आहेत.
— सौ. अमृता वि. शेंडे
amu.shende4@gmail.com
Mrs. Amruta V. Shende
Leave a Reply