खरं ! तर हा विषय फार गहन नाही, खूप सोपा आहे. मला वाटतं सगळी माणसं ज्यांना भाव -भावना आहे, ज्यांनी नवरसाची (रॊद्र, करूण, बीभत्स, इ. इ. ) अनुभूती घेतली आणि या रसावर जी जी माणसे राहत आहे ती ती सर्व मुळात साहित्यकच आहे. पण ते लिखित स्वरूपात आपणासमोर येत नाही. म्हणून ते साहित्यिक नाही असं म्हणणं संयुक्तिक नाही,हा!आता साहित्यिक मूल्ये, कमी जास्त असू शकतात परत ते पिंडे -पिंडे भिन्नही असू शकतात, आपण तुम्ही अन मी सुद्धा तुला फेसबुकवर #आम्ही #साहित्यिक या ग्रुप मधे किती कॉमेंट मिळाल्या किती लाईक मिळाले यावर त्याची लायकी ठरवतो, परत ग्रुपमध्येही अनेक ग्रुप असतात हा विषय वेगळाच…
साहित्य चोरी.. पुस्तकाला लागलेल्या वाळवी सारखी आहे, कुणी लिहिलंय, काय लिहिलंय, पाहायला जावं तर तेच पान नेमकं कुर्तडलेलं दिसतं आता बोला.. माफ करा, बोलणारा साहित्यिक नसतो असा मला म्हणायचे नाही, तर चला !आता पर्यन्त किती दिवाळी अंकात तुझे लेख छापून आले, किती कादंबऱ्या, कथा, कविता प्रकाशित झाल्या यावर त्याच वजन ठरत.
असो !
काही साहित्यिक खरंच उत्कृष्ट असतात पण आपलं नावं होत नाही तोवर आपलं खरं नाव लावत नाही.
उदाहरणा दाखल…
#”केशवसुत “आता मला सांगा ! साहित्य क्षेत्रात कितीतरी केशव असतील अन त्यांची कितीतरी मुलं असतील, परंतु “केशवसुत” एकच आहे आणि ते म्हणजे मा. कृष्णाजी केशव दामले..
मा. माधव त्रंबक पटवर्धन असे नावं असताना #”माधव ज्युलियन “असे परदेशी आडनाव नाव लावायची गरज का लागली? हे गूढ आहे पण त्यांचं साहित्य अस्सल देशी आहे..
#”कुसुमाग्रज”अर्थात वी. वा. शिरवाडकर असे असताना भावाला एव्हडा “भाव” द्यायचं काय बरं कारण असावं?..
मा. माणिक सीताराम घाटपांडे असं म्हटलं की आपलं फेस कसेतरी होते, पण कवी “ग्रेस”म्हटलं की पुढं काही म्हणावंच वाटतं नाही..
“ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता “असे वाचले ऐकले की पोटात एक अनामिक खड्डा पडतो. ही साहित्याची खोली आहे..
आपण प्रत्येक जण साहित्यिक आहोत याचा मला अभिमान आहे, भले मग मान असो वा नसो !
…तेव्हा इतर काही लिहिण्याऐवजी, मला जे अन जसं सुचले…तसं लिहिले आहे…!
आपण साहित्यिक आहात, चुकल्यास क्षमस्व!!
— दिनेश खोल्लम (9892301523)
dkhollam12@gmail.com
Dinesh Khollam
Leave a Reply