पत्रास कारण की , मित्रा ….
सध्या मनमोकळं बोलणंच होत नाही .
दिवस सरत जातो की ,अगदी व्यस्ततेत…
पण दिवसाशेवटी जीव रमेल असं ,
जगणंच होत नाही …..!!
आठवतात रे कैक जुने दिवस… ,जुन्या गोष्टी .
बनवलेले कंदील, किल्ले नी
साठवलेली , तोडलेली पाने फुले .
एकत्र घालवलेले तमाम क्षण….
हातावर , वही मागे सोडवलेली ” flame ” ची आकडेमोड….
शेवटी काय उरतं …त्याची ओढ ….!!
खुपसं भंकस , गुपीतं…. आणि काहीबाही …
पण आताशा मैत्रीतही तसं काही….
“अस्सल जाणवत नाही ….!!
दिवस सुरु होतोच वेगवेगळ्या डे आणि मेसेजेस च्या रतीबा ने…
पण पुर्वीच्या लांबून पत्राने कळविलेल्या
निरोप किंवा बातमीची सर….
कशालाच येत नाही…!!
दसरा दिवाळी नी तत्सम सणांचीही
महागडी ग्रिटींग्स नी गीफ्ट्स …
कमी का पाठवतो आपण एकमेकांना ?
पण पुर्वी तू पळत पळत हातात माझ्यासाठी
घेऊन आलेल्या अर्ध्या लाडवाची चव ….
“कुछ मिठा हो जाये ” ने कशीच भरुन
निघत नाही …..!!!
अजूनही भेटीसाठी हुरहुरते की मनं…..
पण पुर्वीची उर धपापणारी ओढ …
नी भेटलो की डोळ्यातून अख्खं…. सांगण्याची किंवा” किती सांगू नी किती नाही” ची आत्मियता…
मोबाईलवरच्या चॕटींग मधे शोधुनही
सापडत नाही ….!!!
आयुष्यात अडलेले ….,जिव्हारी लागलेले …, साचेलेले किती प्रसंग नुसता
चेहरा पाहून ” काही तरीनक्की बिनसलंय ह्याचं ” ची गॕरंटी .. व्हिडिओ काॕलने ही देता येत नाही .
किती फाॕर्मल वागतो रे आपण…..
चेहऱ्यावर मुखवटा चढवून .
आपलं नात ग्लोबल नी आॕनलाईन करण्यापेक्षा……
टचेबल नी फाईन करुया ……!!
मनातलं सारं मनकवडं बनून सांगुया…
म्हणून तर…….
पत्राचं निमित्य शोधून काढलंय !!
पुर्वीच्या सुंदर दिवसांच्या
“साजुकपणाला “
परत नव्याने आमंत्रण धाडलंय……!!
© ® डॉ शुभा
(आवडल्यास नावासहीत शेअर करण्यास हरकत नाही.)
##पत्रासकारणकी…..
— डॉ. शुभांगी कुलकर्णी
Dr. Shubhangi Kulkarni
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4122945254388525/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/drshubhangi.kulkarni?
Leave a Reply