दूरवरून सायकलची
तुमच्या, घंटी वाजायची
इकडं आम्ही अभ्यासातून
टुणकन उडी मारायची.
पत्र शुभेच्छांची,खुशालीची
तेव्हा म्हणायचे त्याला डाक
थंडी वारा पाऊस असता
खणखणीत तुमची हाक.
पैसे मनिऑर्डरचे द्यायला
नोटा मोजायची तुमची अदा
उगवे पिशवीतून ‘चांदोबा’
आम्ही असायचो त्यावर फिदा.
मज्जा कळली आम्हाला एक
मास्तर असतात तुम्हालापण
शाळा कुठे?पोस्टात भरते?
छप्पीचं होतं का दडपण?
येणं तुमचं दिसणं तुमचं
जणू देवदूत तुम्ही झालात
आम्ही थँक्यू म्हणावं तुम्हाला
कळण्याआधी निवृत्त झालात…
©सौ.कविता सुरेश काळवीट.
पुणे.
९-१०-२०२०
— कविता काळवीट
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113210515361999/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/kavita.kalwit?
Leave a Reply