मला जेव्हा असा प्रश्न विचारला असता तर जो अस्वथ आहे आणि त्याच्या मनाचा हुंकार म्हणजे साहित्याची निर्मिती. )ग त्यासाठी त्याची मराठी व्याकरणावर पकड असणं गरजेचं असतं असं नाही.
इंग्लिश भाषेत अशी अनेक उदाहरणे आहेत की जी पुस्तके खूप प्रसिध्द आहेत पण व्याकरण मात्र ठण ठण गोपाळ….
कोणतीही व्यक्ती उस्फुर्त लिहू शकत असेल आणि तिच्या साहित्याचे कौतुक होत असेल तर तिला साहित्यिक म्हणायला हरकत नाही. त्यासाठी प्रस्थापित नियम लावालयाच हवा असे नाही.
मराठी व्याकरण किचकट आहे तेव्हाआपले जेवढे जमेल तेवढं करावे. आपल्या मनातील हुंकाराची अभिव्यक्ती महत्वाची मग त्याची गणना साहित्यात होउ दे की नाही.
मला तर वाटते जे वाचनीय आहे ते साहित्य . आणि जे तसे लिहू शकतात ते साहित्यिक !
— धनश्री देशमुख
Dhanashri Deshmukh
Leave a Reply