लिहितो तो साहित्यिक आणि वाचतो तो वाचक!!एवढे सोपे आहे तर मग चर्चा कशाला?आपल्या ग्रुपचे नाव”आम्ही साहित्यिक”म्हणून आत शिरताना चारदोन चारोळ्या आणि चारदोन कविता(ज्या मला स्वतःला जॅम भारी वाटत होत्या)यांच्या फटीतून चंचुप्रवेश तर केला पण पुढे अंगठेबहदूरीहून जास्त काही जमेना.आजही या चर्चेत मी वाचकाच्या भूमिकेतूनच भाग घेतेय.
जो स्वतःला साहित्यिक समजतो तो साहित्यिक अशीही एकक व्याख्या होऊ शकते.कविता ,चारोळ्या तिनोळ्या, दोनोळ्या आणि हो अगदी एकोळ्यासुद्धा टाकसळीतून पडल्यासारखा रोज पडू लागल्या की साहित्यिकांची मांदियाळी ग्रुपवर अवतरली असा भास होतो..अशावेळी काही चिवट अंगठेबहादूर वगळता इतरांची पंचाईत होते…पण त्यांना लाईक करणाऱ्यांच्या दृष्टीने हे साहित्यिकच असतात
असो,एक वाचक म्हणून साहित्यिक कोण,तर एखादी घटना,दृश्य, संभाषण,निसर्गातील विविध अद्भुत चमत्कार,सौंदर्य,सुख,दुःख सामाजिक चालीरीती या आणि आणखी कितीतरी गोष्टी यांच्या गाभ्याशी जाऊन,समजून उमजून जो त्यावर लिहू शकतो,त्याची स्वतःची विशिष्ट शैली,त्याने विषयाच्या मुळाशी जाऊन केलेले संशोधन(विज्ञान,ईतिहास आणि विविध शास्त्रविषयक लेखनासाठी आवश्यकच)आणि महत्वाचे म्हणजे त्याने लिहिलेले वाचावेसे वाटले पाहिजे तो साहित्यिक!अशा साहित्यिकांचा एक आब आणि रुबाब असतो!! एखादा चार सहजसोप्या शब्दात जेवढे सांगतो ते एखाद्याला शब्दबंबाळ अलंकारिक चार पानातही सांगता येत नाही..अर्थात त्यांनाही वाचक मिळतात म्हणून ते ही साहित्यिकच!साहित्यिकांप्रमाणे वाचकांचीही श्रेणी असते,थोडक्यात लेखकाचा वकुब आणि आवाका वाचकाच्या वकुब आणि आवाक्याशी match झाला की “या मनीचे गुज त्या मनी”पोहचते!तो असतो त्या वाचकाच्या दृष्टीने साहित्यिक!!
थोडक्यात,”साहित्यिक देणारा आणि वाचक घेणारा”या भूमिकेतून बाहेर पडून जो लेखक वाचकाला समान भावनिक पातळीवर आणतो तो साहित्यिक
गृपचे नाव यथार्थपणे सार्थ करणारे साहित्यिक आपल्याही ग्रुपवर खूप आहेत.,सचिन देशपांडे,प्रशांत। देशपांडे,किरण बोरकर,माधवी ताई,लिनाताई,कौस्तुभ। केळकर,सरोजताई ..किती नांवे घेऊ?(शब्दमर्यादा..)आणि हो प्रकाशत्रयी-प्रकाश तांबे,प्रकाश गोसावी,प्रकाश पिटकर सुद्धा(त्यांचा कॅमेरा शब्दांहुन बोलका आणि संवेदनशील आहे,सोबत कवितांची निवड लाजवाब!)शेवटी आपला तरुण दोस्त प्रणव उन्हाळे..त्याला विसरून चालणारच नाही.पुस्तक परिक्षणाला पुस्तक अनुभवलेखनाला आणि समीक्षणा ला साहित्य म्हणायचे की नाही ही चर्चा तज्ज्ञांनी खुशाल करावी,.आम्हा वाचकांच्या दृष्टीने तो साहित्यिकच!!
— डॉ.मंगल गवळी
Dr. Mangal Gavali
Leave a Reply