अनादी कालापासून मानव आपल्या भावभावनांच्या प्रकटीकरणासाठी भाषेचा वापर करतोय.. याच भाषेचा आधार घेऊन, तो आपल्या मनातील विचार, तर्क, भाव.. आपल्या शैलीत मांडतोय.. प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार.. प्रत्येक जण, आपापल्या मतांना, भाषेचा वापर करत.. न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.. त्या-त्या भागातील भाषा संस्कृतीचा पगडा.. तिथे जन्माला येणाऱ्या व्यक्तींवर.. जन्माला आल्यापासूनच असतो.. जे अभिप्रेत असते.. पण साहित्य म्हटलं की “भाषा”.. जी शुद्ध असणे.. हे ही तितकेच गरजेचे आहे.. विविध लेखन प्रकार वगळता, भाषेकडे लक्ष देत लिहीणे आज जास्त गरजेचे आहे..
आपण जे काही लिहीतोय.. ते जनसामान्यांच्या वाचनात आल्यावर.. त्याचा अर्थ त्यांना लागावा.. यादृष्टीने भाषा वापरली.. तर आपण लेखनात काय मांडतोय..? हे वाचकांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही.. लेखक किंवा कवी /कवयित्री व वाचक.. यांच्या मधला दुवा ही “भाषाच” असते.. या भाषेमुळेच लेखन समृद्ध होते.. खूप अलंकारिक लिहिलंय म्हणून ते लेखन समृद्ध.. असेही मुळीच नाही.. फक्त लेखनाचा मूळ गाभा वाचकांपर्यत पोचणे हेच अभिप्रेत असते.. अस माझ मत वैयक्तीक मत आहे..
आजवर अनेक थोर साहित्यिक होऊन गेलेत.. ज्यांच्या लेखनाने त्यांनी साहित्यिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.. पण यातील सगळेच कुठे अलंकारिक भाषा वापरत होते?..साध्या सरळ माणसापर्यंत आपले विचार.. व. पु. काळे यांनी सोपी भाषाशैलीने पोचवलेतच की..त्याहीपेक्षा रूजवलेतं. अस म्हणणं जास्त योग्य ठरेल..
एखादे पुस्तक वाचताना.. “अरे.. हे आपल्या बाबतीतच लिहिलंय जणू”.. अशी प्रतिक्रीया जेव्हा वाचकाच्या मनात उमटून जाते ..त्या लिखाणाला “साहित्य” म्हटल्यास वावगे ठरणार नाही.. वाचकाच्या डोळ्यांसमोर पुस्तकातला किंवा लेखनातील एखादा प्रसंग जसाच्या तसा.. जिवंत करणारे लेखन.. म्हणजे “साहित्य”.. अर्थात, मनाचा ठाव घेणारी कुठलीही शब्द रचना.. मग तो लेखनाचा कुठलाही प्रकार का असेना?? ज्यात.. वाचक म्हणून भाषेने का होईना.. लेखकाच्या मनाच्या आंदोलनांशी समरस होऊन मनापासून दाद द्यायला भाग पडणे किंवा दाद मिळवणे.. म्हणजेच “साहित्य”..
साहित्य ‘श्रेष्ठ’ का ‘कनिष्ठ’ हे ठरवण्याचा अधिकार फक्त वाचकांना.. लेखकाने प्रामाणिकपणे आपले लेखन करणे.. इतकेच त्याच्या हातात असते.. आपले लेखन पटवून ना देता.. ते वाचकांच्या मनाला स्वतःहून रुचणे जास्त महत्वाचे आहे, असे मला वाटते.. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीच्या जोरावर त्याला हवा तसा अर्थ घेणार.. ज्यात काहीच वाईट नाही..
पण, पुन्हा इतकेच सांगेल की.. उत्तम साहित्य निर्मितीसाठी, “वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे लेखन” म्हणजेच “साहित्य” .. अन अशी निर्मिती करणाराच खरा “साहित्यिक” ..
#SampadaGanorkar
— कृष्णसखी
Leave a Reply