साहित्यिक-एक उपासक..
‘आम्ही साहित्यिक’ या ग्रुपमध्ये एक छान उपक्रम म्हणून ‘महाचर्चा-साहित्यिक काेण??’ यासाठी अॅडमिन सरांनी जाहिर केले. या ग्रुपमध्ये इतके दिग्गज आहेत कि, अापण कितपत लिहिणार..असे डाेक्यात वारे फिरू लागले ! पण हल्ली नेहमी क्लिष्ट परिस्थितीमधे वपु आठवतात, “स्वत:ला सावरणे महत्त्वाचे..आवेग आणि विवेक यांचा वापर करून..” मग काय, केली सुरूवात लिहिण्यास.
प्रथम आपण पाहू साहित्य म्हणजे काय ? साेप्या भाषेत, “साहित्य म्हणजे काेणत्याही भाषेतील वाचिक आणि लिखित उपलब्ध साहित्य हाेय.” वेगळया शब्दात मांडायचे तर, “मानवाच्या विचारांना अभिव्यक्त करण्याचे प्रमुख माध्यम हाेय.” आदिवासी भाषेत सर्वात जुने वाचिक साहित्य पहावयास मिळते. साहित्यामध्ये कविता, नाटक, निबंध, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, गाेष्टी, अहवाल, रेखाचित्र इ.चा समावेश हाेताे.
साहित्यिक म्हणजे काय हे हि पाहूया..साेप्या भाषेत अर्थात माझ्या शब्दात, “साहित्यिक असा जाे अवगत असलेल्या भाषेत समजेल..उमजेल असे लिहिताे. आजूबाजूच्या परिस्थितीचे, जाणिवांचे भान ठेवून असताे. जाे श्राेता वर्ग आहे त्यांच्या मानसिक आणि भावनिक गरजांची आेळख ठेवताे. तळागळातील सकल मानवांच्या मन:स्थितीचा विचार करून लिहिणारा खरा साहित्यिक..” हा साहित्यिक जरा जास्तच जवळ हाेताे वाचकांच्या मनाशी नाही का ??
#उदा. अण्णाभाऊ साठे, इंदिरा संत, बहिणाबाई, शिवाजी सावंत, मुक्ता चैतन्य आणि माझे लाडके वपु.
साहित्यिक एकाच विषयावर लिहिताे असेहि नाही. विविध विषयांचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. आपल्या ग्रुपमधेच असे अनेक दिग्गज आहेत जे विविध विषयांवर लिहिताना चुणूक दाखवितात आणि यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे स्वत:स दिग्गज न मानता ते इतरांचे काैतुक करतात. (Down to earth)
साहित्यिकाने नेहमी जितके सुंदर आणि नव्या अनुभवाची प्राप्ती हाेईल असे सतत लिहावे, वाचकांना स्वर्गसुखाची पर्वणी द्यावी. काहीवेळा लिखाण हेतुने केले जावे म्हणजेच काही गाेष्टी समाजाच्या तळागाळात पाहाेचल्या जाव्यात.
#उदा. समाज जीवनाचे चित्र, संस्कृती, हक्क, सरकार, आधुनिक जगाची आेळख.
यातही बर्याच साहित्यिकांनी याेगदान दिले आहे. साहित्यिक विविध क्षेत्रातील असू शकतात म्हणजे कार्यक्षेत्र वेगळं अन् लिखाण मात्र आवडीने करतात. आपल्या गटात असे पाहिले आहेत मी “आॅलराउंडर”.
साहित्यिक काय करू शकतात..मला जाणवले ते काही मुद्दयांमधे मांडले आहे :
१) कधी जीवनात नैराश्य आलेल्या लाेकांना उभारी देतात साहित्यिक.
२) कधी प्रबाेधन करतात तर कधी जिज्ञासा वाढविण्याचे कामही करतात साहित्यिक.
३) काहीवेळा संतांनी आत्मज्ञानाचे मार्गही साहित्यामधून दाखविले आहेत.
४) काहीवेळा आपल्याला शुध्द् आनंद आणि आल्हाददायक अनुभूतीही प्राप्त हाेते.
अनेक साहित्यिक आपल्या भारतभूमीमध्ये हाेऊन गेले आहेत आणि अनेक परकीय साहित्यिकही आहेत ज्यांचा आपण वेळाेवेळी अभ्यास करताे.
साहित्यिक कसा असावा ? याचे मला जे उत्तर मिळाले ते असे, “स्वत: ज्या धर्तीवर आहे त्यास समजून-उमजून लिखाण करणारा, ज्यावर सभाेवतालचा वाचकवर्ग उपलब्ध आहे. आपण कितपत वाचकांच्या संबंधित लिहू शकताे हेही जाणून घ्यावे. शुध्द लेखन आणि व्याकरणाचा जाणकार असावा. जितके चांगले देता येईल ते फक्त देत जावे.”
वपुंचे एक वाक्य आठवले, “फुलाकडून काही शिकण्यासारखं आहे तर ते म्हणजे सुवास पसरवणे. जे द्यावे ते फक्त सुंदरच..” साहित्यिकाने फुलासारखे राहून दान करावे लिखाणाचे जे वाचकास अनुभवसंपन्न करेल आणि सर्वात महत्त्वाचे साहित्यिकाने स्वत:स बदलत्या तंत्रज्ञानानुसार अपग्रेड असावे.
असा साहित्यिक नसावा, “माझेच लिखाण उच्च दर्जाचे किंवा लाेकप्रिय..” हा साहित्यिक म्हणजे साहित्यिक नसून फेसबुकवर फ्रेंडलिस्ट वाढविणारा फेसबुकीयनच….
(शेवटी एक सांगावे वाटते, व्दितीय वर्ष B.Ed. ची परीक्षा आत्ताच दिली आणि जणू काही तिसर्या वर्षाचे हे लिखाण मला प्रात्यक्षिक वाटते आहे तेही अगदी अप्रतिम )
….काही चुकल्यास क्षमस्व
— मनिषा डोंगरे कुलकर्णी
Manisha Dongare kulkarni
Leave a Reply