चर्चेचा विषय तर अगदी जिव्हाळ्याचा.कारण अगदी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या सर्वानाच ‘साहित्यिक’ म्हणजे आत्यंतिक आदराने ज्या लेखक व्यक्तीच्या पायावर डोके ठेवल्यावर कृतकृत्य वाटेल अशी व्यक्ती!मग वाटणारा आदर हा त्या व्यक्तीच्या विचारांबद्दल असू शकतो किंवा भाषाशैलीबद्दल असू शकतो किंवा साहित्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल असू शकतो
थोडक्यात सांगायचे तर .….’साहित्यिक ही व्यक्ती लेखक असायला हवी आणि लोकांच्या आदरास पात्र असायला हवी.’….
सातत्याने आपले विचार,अनुभव ,मते किंवा भावना शब्दबद्ध करून लोकांपर्यंत मांडणाऱ्या व्यक्तीना लेखक म्हटले जाते…..आणि हे लेखन जेव्हा वाचकांच्या हृदयापर्यंत पोचते,मनाला भिडते तेंव्हा आपसूकच तो लेखक किंवा ती लेखिका ‘साहित्यिक’ या बहुमानास पात्र ठरते.
हा बहुमान कोणत्याही एका समारंभात किंवा कुठल्या एका संस्थेने दिलेला किंवा स्वयंघोषित नसून ती त्या लेखकाच्या लिखाणावरील प्रेमाची वाचकांनी व समीक्षकांनी दिलेली पोचपावतीच असते.
आजकालच्या काळात अनेक संवेदनशील लोकांना वेगवेगळ्या प्रसंगी शब्दातून व्यक्त व्हावेसे वाटते आणि सुदैवाने अशा प्रकारची व्यासपीठे उपलब्ध देखील आहेत.फक्त अशा उत्साही लेखकांना साहित्यिक या पदापर्यंत पोचवण्यासाठी त्यांचे लेखन काळाच्या कसोटीवर उतरले पाहिजे .
— मंजिरी पानसे
Manjiri Panse
Leave a Reply