मीनाक्षी देशपांडे

महाचर्चा साहित्यिक कोण? जो चांगले लिहू शकतो, चांगल्या लिखाणाची जो प्रशंसा करू शकतो. ज्याला वाचनाचा व्यासंग आहे, आवड आहे. आणि ज्याच्यावर लेखणी प्रसन्न आहे म्हणजे ज्याच्या लिखाणात देवी सरस्वती वास करते. उस्फूर्तपणे ज्याला लिहिता येते, तो साहित्यीक. जो खरा साहित्यीक असतो त्याला शब्द आपोआप सुचतात. त्याला विषयही अगदी आपोआप मिळतात. विनासायास शब्दांची जोड मिळते आणि अतिशय उत्कृष्ट असे लेख, कविता तयार होतात. ज्याची भाषा अगदी ओजस्वी सहज सोपी असते. ज्यांचे लिखाण वाचायला घेतले असता सम्पूर्ण वाचून होईपर्यंत आपणास वाचनात खंड पडू नये असें वाटते तोच खरा साहित्यीक. आजकाल दुसऱ्यांचे लिखाण स्वतःच्या नावावर खपवणारे पण काही लोक असतात.

जे असें साहित्याची चोरी करतात ते कधीच खरे साहित्यीक होऊ शकत नाही. प्रांजळपणा हा साहित्याचा पाया आहे. एखादया विषयावर लिहायचे म्हटले की ते कागदावर उतरवल्याशिवाय ज्याला काहीही सुचत नाही, ज्याने विश्वातले अमर्याद ज्ञान वाचनाने आपल्या पदरात पाडून घेतलेले असते. कारण कुठल्याही विषयावर लिहिण्यासाठी वाचनावर प्रभुत्व असायलाच हवे. ज्याने अपार वाचन केले आहे, त्याच्या जवळ अमर्याद शब्दसंपदा असते. शब्दांची श्रीमंती असल्या शिवाय तुम्ही श्रेष्ठ साहित्यीक नाही होऊ शकत.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू। शब्दची अमुच्या जिवीचे जीवन।शब्द वाटे धन जनलोका।
मुख्य म्हणजे खरा साहित्यीक हा ऐक चांगला मनुष्य असला पाहिजे. चांगल दर्जेदार लिखाण करण्यासाठी तो उत्कृष्ट वाचक असला पाहिजे. पु ल देशपांडे, व पु काळे, वी स खांडेकर, इत्यादी( यादी फार मोठी होईल म्हणून मोजकीच नावे देतेय.) आपल्याला मोलाचे साहित्य दिलेय. हे समाजात उत्कृष्ट व्यक्ती होते. साहित्यीक होण्यासाठी चांगला व्यक्ती असणे हेही आवश्यक आहे.

— मीनाक्षी देशपांडे
Meenakshi Deshpande

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*