
जलभरल्या मेघांना तो भार न पेलवून ते जसे मनमुराद कोसळतात तसाच स्वतःच्याच विचारांचा भावनांचा भार हलका करायला ज्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो तो असतो साहित्यिक. पण म्हणून तो साहित्यिक म्हणून मान्यता प्राप्त करू शकत नाही. ते स्वान्तसुखाय लेखन वाचकांच्या पसंतीला उतरलं की मग होतो साहित्यिक.
गदिमांचे गीतरामायण असो की खेबुडकरांची लावणी की संदिप खरेची एखादी खोडकर कविता, या सगळ्याचाच एक वाचकवर्ग आहे जो जीव तोडून त्या त्या प्रकारावर प्रेम करतो. तसच आहे अन्य साहित्य प्रकाराचंही… जे वाचताना वाचकाला अनन्यसाधारण आनंद मिळतो. *स्वतःच्या भावनाना शब्द गवसल्याची भावना जेव्हा वाचकाला होते तेव्हाच तो वाचक त्या लिखाणाला मनापासून मान्यता देतो*. आणि अशी मान्यता मिळाल्याशिवाय ते लिखाण साहित्य म्हणून मान्यता प्राप्त करू शकत नाही, भले मग ते कोणत्याही प्रकारचे असो व त्याचा थोडाच वाचकवर्ग का असेना, ते लिखाण साहित्यच आणि लिहिणारा साहित्यिकच…. असं माझं मत.
— सौ. स्मिता परदेशी
Mrs. Smita Pardsehi
Leave a Reply