साहित्य हा शब्द वाचकांच्या अभिरुचिशी बांधला गेला आहे.त्यामुळे साहित्यातही अभिरुचीयुक्त आणि अभिरुचीहीन साहित्य आलेच.
अभिरुचिहीन साहित्य सर्वसामान्य लोकांना आवडत नाही.पण तरीही त्याचा लेखक आणि वाचक वर्ग असतोच ते ही साहित्य असतेच.अनेक जण चोरून वाचतात,त्याचाही (आंबट)शौक असतोच.त्यावर खूप बोलण्याची गरज नाही.
साहित्यिक अभिरुची असलेला मोठा वाचक वर्ग आहे. तो स्वतः पुस्तके विकत घेऊन वाचतो त्यावर चिंतन करतो.निरूपण ,प्रवचन,भाषण उद्बोधन यातून विचारही मांडतो.आणि क्वचित प्रसंगी कुठल्या मासिक
नियतकालिकांतून लिखाण ही करतो.तो ही साहित्यिक असतोच.
साहित्य प्रकारात पंत साहित्यापासून आतापर्यंत च्या सर्वच साहित्य प्रकाराचा समावेशआहे.
कविता,लेख,ललीतगद्य,स्फुटलिखाण,कादंबरी,लघुकथा,नाटक, दीर्घकाव्य,आध्यात्मिक साहित्य,शृंगारिक साहित्य, निखळ विनोदी कथा रहस्य कथा,विज्ञान कथा,ऐतिहासिक साहित्य,,बखर साहित्य,
लोकजीवनावरील साहित्य,,पर्यटन कथा,बालसाहित्य,
वन्य जीवन अशा कितीतरी प्रांतात समृद्ध लेखन झाले आहे.
भारतीय लेखन आणि साहित्यकलेला प्राचीन परंपरा आणि समृद्ध वारसा आहे.रामायण,महाभारत ही महाकाव्ये ,भर्तृहरीचे नितीशतक मोरोपंतांची आर्या, वामन पंडितांचे श्लोक,ज्ञानदेवांची ओवी,तुकोबांचे अभंग, संत साहित्य असो की बहिणाबाईंची कविता आपणास अभ्यासावी लागेल.ग्रेस यांची दुर्बोधता समजून घ्यावी लागेल.,कुसुमाग्रज,बा.सी.मर्ढेकर,कवी महानोर यांच्या कविता जगाव्या लागतील.पत्रकारितेत तर कितीतरी विषयावर लेखनाला वाव आहे.
लेखणीला बंधन नसते,नसावे.विभावरी शिरूरकर हे नाव कमी लोकांना माहीत.त्या काळात स्त्रियांच्या समस्या मांडणाऱ्या कर्वे सारखे लेखक.
स्वतःच्या नावानेही लिहणे म्हणजे समाज बहिष्कृत होणे.
तेव्हा त्यांनी साहित्य जगवले.लेखणीला झरणी म्हणतात,
शाई चा सबंध झरण्याशी असतो. आणि जर आपण साहित्यिक असू,तर आपला संचार साहित्याच्या
सर्व प्रांतात मुक्त वाहणाऱ्या झऱ्या प्रमाणे असायला हवा.लेखन समृद्धता वाचनाने येते.साहित्य सागरात खोल शिरल्यावर येते.जितके खोल जाल तितकी सुंदर साहित्य रत्ने गवसत जातात.त्यासाठी मंथन करण्याची आपली तयारी किती आहे हे आपले आपण ठरवायचे.
दुसरा किती चुकतो हा साहित्यिकांचा भाव नसावा.चूक होतच असते.माझ्या पहिल्या लघुनिबंधात प्रत्येक पानावर ऱ्हस्व दीर्घाच्या दहाचेवर अशा साठा हुन अधिक चुका कै. डॉ.वि.ग. कावळे यांनी काढल्या होत्या.ज्ञानेश्वरीचे अभ्यासक प्राचार्य डॉ.कावळे यांनी सातत्याने मागे लागुन ,माय मराठीचा अभिमान माझ्यात रुजवला.त्यामुळे कुणाचे विचाराशी असहमती असेल
तर तेही लिहा.संदर्भ चुकले असेल,शब्द सुलभता नसेल तर जरूर लिहावे.पण साहित्यावर हीनतेचा आरोप व्हायला नको.साहित्य हे शिव असावे शिवराळ असू नये.
साहित्य अभिरुचीहीन होऊ नये.बुद्धिभेद करणारे नसावे.त्यातून संस्कार,विज्ञान,परंपरा इतिहास भविष्यकाळ डोकावत राहणे आवश्यक.आपला धर्म लवचिक आहे.कुठल्याही पुस्तकात तो बांधल्या गेला नाही.म्हणून आपण मागील हजारो वर्षापासून विचाराचे आदानप्रदान करीत स्वतःला जपू शकलो.ग्रीक,हुण, यवन, रोमन,असेंरियन इजिप्शियन या संस्कृती व त्याचे साहित्य काळाच्या ओघात नष्ट होत गेले .
भारतीय साहित्याची धारा वेदापासून सुरू होते. तिला अंत नाही.सर्व विश्वातून ज्ञान आमच्यापर्यंत येऊ दे..अशी उदात्त भावना जपणाऱ्या स्रोताचे आपण एक भाग आहोत.वैचारिक ,सामाजिक सांस्कृतिक,बांधिलकी जपणारे साहित्य निर्माण करण्याचे दायित्व साहित्यिक मंडळींवर आहे.ते आपण करू शकलो तरच साहित्यिक
म्हणून सार्थ अभिमान बाळगता येईल.
— मुकुंद हरिहर देशपांडे वर्धा
Mukund Harihar Deshpande Vardha
Leave a Reply