प्रकाश तांबे

या महाचर्चेत भाग घेतलेल्या ‘आम्ही साहित्यिक’च्या सर्व मान्यंवर सभासदांच्या प्रतिक्रियेतून स्फूर्ती घेत ” साहित्यिक कोण ” या विषयी मला स्फुरलेले विचार मी मांडायचा प्रयत्न करत आहे. क्षमस्व.

मराठी वाङमयाच्या पद्य प्रकारात लेख, नाटक, कथा, कादंबरी तर पद्य प्रकारात कविता, गीत, लोकगीत, बालगीत, गझल, अभंग, भजन, पोवाडा, लावणी, कीर्तन वगैरे प्रमुख प्रकार मोडतात. या सर्व कलाकृती सादर करणारे कवी किंवा लेखक हे शब्दांशिवाय जसे वाचकापर्यंत पोहोचू शकत नाहीत तसेच कवी किंवा लेखक हे वाचकांशिवाय साहित्यिकही होऊ शकत नाहीत असे मला वाटते.

प्रथितयश साहित्यिकाची जडणघडण जनमानसाच्या प्रतिसादातून हळुहळु उदयास येते. या प्रवासात उमेदवारीच्या काळातील उपेक्षा (उपासमारही) असते आणि तरीही साहित्यिक व्हायची अपेक्षा आणि प्रतिक्षा असते. कवी वा लेखकाला उमेदवारीपासून ते साहित्यिक या बिरुदापर्यंत पोहोचवताना वाचक त्याच्या कलाकृतीकडे स्वतःच्या आवड आणि प्राधान्यानुसार बघतो. त्याला कधी सादरकर्त्याची तार्किक आणि सुसंगत मांडणी आकृष्ट करते तर कधी त्याची वैचारिक प्रगल्भता. विषयाचे नाविन्य, देशभक्ती, समाज प्रबोधन, भाषेवरची हुकुमत, विशिष्ठ शैली वगैरे निकषावरही कवी वा लेखक त्याला भावतो आणि त्यातूनच साहित्यिक जन्माला येतो. लेखक वा कवीची साक्षरता हा मुद्दा तर गौणच असतो उदा. काही संत वाङमय.

शिवाजी म्हणतो म्हणून उद्यापासून मी किंवा तुम्ही साहित्यिक असे होत नसून ती साहित्यिकाला जन्मभर पुरणारी प्रक्रिया आहे म्हणूनच जो लिहितो तो साहित्यिक असे नसून ज्याच्या लिखाणाला एक ते अनेक वाचकवर्ग मिळतो तो साहित्यिक असे माझे मत आहे. त्या निर्मितीची प्रत जशी जनमानसात रुजत जाते तस तसा तो प्रथितयश होतो एवढेच पण उमेदवारीपासुनच तोही साहित्यिकच.

धन्यवाद.

प्रकाश तांबे
8600478883
Prakash Tambe

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*