संदीप कोकिल

आता ना मुद्दलात हा विषय सुरू होतोच ..साहित्या पासून…आता मला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ..लिखाण या गोष्टी ला साहित्य का..?? संबोधल गेलं त्या बद्दल..?? पण जाणकार व्यक्ती चं मार्गदर्शन मिळालं.. कळलं..की साहित्य म्हणजे नेमकं काय..?? तर शुद्ध आणि आपल्या सोप्प्या बोली भाषेत ..”सामान” पण त्यातल्या त्यात निवडक,उपयुक्त,दर्जेदार आणि आवश्यक…असं ते..साहित्य…!! उदा.पुजेचं साहित्य..(याला सामान असं नाही म्हणता येणार) …असो..!!!
आत्ता या साहित्या बाबत …आणि त्याची निर्मिती करणाऱ्या साहित्यिकां बाबत लिहायचं म्हणलं…!! तर..निदान #महाराष्ट्र तरी या बाबतीत खुपचं सधन..आहे असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही..कारण इथलची जी संस्कृती आहे तीच मुळात संत..,महात्मे..,कवी.., लेखक….या लोकांनी ओतप्रोत आहे..!!!
पण साहित्यिक कोण..?? जेंव्हा हा प्रश्न चर्चे साठी उद्भवला आहे…तेंव्हा आता समस्त लेखक वर्गा चा ओवाहपोह करणं अभिप्रेत झालं….!!
आत्ता.. पुन्हा प्रश्न..?? साहित्या च्या वर्गिकरणाचा.. कारण …”जे ना देखे रवि.. ते देखे लेखक.. आणि कवि..”
साहित्यामध्ये..काल्पनिक,वास्तविक,समाजप्रबोधन पर आणि अध्यात्मिक असे अनेक प्रकार..आहेत..पण त्यातल्या त्यात..जर आपल्या मराठी मधलं जवळ चं उदाहरण घ्यायचं झालं तर..”सैराट” कथा..अतिशय वास्तविक आणि..प्रत्येक सर्व सामान्य..व्यक्ती च्या जीवनात घडावी ..अशी..!! शेवटी कामवलेना..1 करोड..अर्थात..प्रेक्षकांना भावली तेंव्हा..!!
महाराष्ट्रा चं आराध्य पु.ल…लेखन असो अगर कथा-कथन स्व-अनुभवा वर आधारित आणि वास्तविकते शी निगडित लिखाण..जे वाचकांना नुसतंच भावत नाही तर पसंतीस पण उतरतं…!! पण काल्पनिकता पण या तुन दूर नाही..असे भरपूर साहित्यिक..जे फक्त आणि फक्त काल्पनिक लिखाणाच्या जोरावर..वाचकांना ची मनं जिंकून घेतात..!!
मुळात लिखाण..ही प्रत्येक..व्यक्ती च्या..” बस ची बात नाही..!!” …तर…अंतर मना तून ..नैसर्गिक रित्या..उमटणारे..वास्तविक..अगर…काल्पनिक भाव..योग्य शब्द..,काळ..आणि (वाचकाच्या) मनाला भावेल अश्या भाषेची निवड करून..केलेलं लिखाण करणारे…खरे…साहित्यिक..!!!
अर्थात…या साहित्य सागरात नुकताच चंचू प्रवेश केलेला…मी अतिशय पामर…!!!
विचार पटले…तर..आभारी..न पटल्यास क्षमस्व.
— संदीप कोकिल
Sandeep Kokil

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*