शेषराज भोसले

निसर्गाच्या विपुल सौंदर्याला ज्याने आपल्या लेखणीने मूर्त रूप दिले ते लेखन म्हणजेच साहित्य, मग ते कसलही असू शकत या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट ही निसर्गाच्या नियमांनी सुरू असते, ती चांगली, वाईट, पाप, पुण्य काहीही असूद्या अगदी चोरी करणं हे देखील, कारण ती एक भावना आहे व ती निर्माण झाली ती विचाराने व विचार निर्माण झाले ते निसर्गाच्या देणं मुळेच. या प्रत्येक गोष्टीला निरखून तिच्या गाभ्यात जाऊन ती दिसते तशी व जी दिसत नाही ती देखील आपल्या लेखणीतून जगासमोर मांडतो तो साहित्यिक, जो या निसर्गातील घडामोडी आपल्या बुद्धी चातुर्याने, शब्दात बदलवण्याची धमक ठेवतो तो साहित्यिक.
मी तर म्हणेन जो लिहू शकत नाही, वाचू शकत नाही परंतु त्याच्या कल्पकतेने एक जिवंत चित्र इतरांच्या नजरेसमोर उभ करेल तो साहित्यिक, काना, मात्रा, वेलांटी, दीर्घ,रहस्व ही तर व्याकरणाची मक्तेदारी हो, परंतु या मक्तेदारीला आपल्या विचारांच्या जोरावर व लेखणीच्या सामर्थ्याने जगमान्य असा विजय मिळविता येईल तो साहित्यिक.
खर पाहता साहित्यिक हा एवढा छोटा शब्द नाही की एका पानात कैद होईल, अनेक पुस्तके तयार होतील एवढा मोठा शब्द हा, तरी शेवटचं सांगेल,
जो आपल्या लेखणीने अनेकांची जीवन समृद्ध करेल तो साहित्यिक.

— शेषराज भोसले
Sheshraj Bhosale

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*