जो आशयघन शब्दांतून लेखन करतो..
जो जे काही लिहितो,ते वाचताना वाचक इतका तन्मय होतो की कधीकधी त्यातील नायकाला स्वत: च तो नायक असल्याचा भास होतो.
लिखाणामधे नवरसांपैकी एका तरी रसाची प्रचिती येते.
वाचकाला खूपशा गोष्टी माहित असतात. पण कुणाजवळ व्यक्त करताना संभ्रम असतो. साहित्यिक त्याच गोष्टी शब्दांमधे गुंफताना कचरापट्टी पाल्हाळ त्यागून ती घटना सुबोध वाक्यांमधे लिहीतो.
जो कुणाचीही बाजू न घेता प्रत्येक घटनेला, व्यक्तिरेखेला न्याय देवून लिहीतो, परिस्थिती साक्षात डोळ्यासमोर उभी राहील असे लिखाण करतो तो खरा साहित्यिक.
ज्याचे लेखन साहित्य वाचल्यानंतर सहजपणे मनातील दु:ख , वेदना, सुख, आनंद, भिती या जागृत होतात, तर कधी कधी मनावरील दु:ख कष्टाचे मळभ निघून जाते, भुतकाळ व वेळकाळाचे बंधन ही निघून जाउ शकतात.
एकंदर ज्याचे साहित्य हे मर्मस्पर्शी असते, तो खरा साहित्यिक.
अर्थु बोलाची वाट पाहे ।
तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये।
भावाचा फुलौरा होत जाये।
मतिवरी ॥(ज्ञानेश्वरी)
अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पहात असतो, शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नानाप्रकारचे श्लेष सुचू लागतात.
— श्रीकृष्ण
Shreekrishna
Leave a Reply