“साहित्यातील कलाकार”
ज्याच्याकडे लिखाणाचे कौशल्य आहे तोच खरा साहित्यीक असे म्हणने अयोग्य च आहे असे मला वाटते.कारण संत बहिणाबाई यांना लिहीता वाचता येत नव्हते पण त्यांच्या ओव्या, कविता आजही अजरामर आहे आणि राहणार हे सत्य आहे. आज समाजात कैक असे लिहीता वाचता न येणारे व वाचता येत लिहीता येत पण लिहीण्याचे कौशल्य नसणारे लोक समाजात आहे.हे पण खरे साहित्यिक च आहे पण यांना मार्ग शोधता आला नाही, आणि कुणी मार्ग दाखवला नाही.आज जर आम्ही साहित्यिक ग्रुप नसता तर माझ्या लिखानाला साहित्याला कुणी विचारले नसते.असे कैक लोकांचे साहित्य अडगळीत,मनात,कपाटात भरून ठेवलेल्या वहि मध्ये लिहून पडलेले आहे तर कुणी वैकुंठाला गेले तर काही वैकुंठाचया मार्गावर आहेत.माझे वैयक्तिक मत आहे की, प्रत्येक क्षणाला ज्याच्या रूधयातून,मनातून सामाजिक कार्यासाठी,विकासासाठी,अन्याय विरुद्ध पेटून उठण्यासाठी जे लिखाण निर्माण होते,सुचते तो खरा साहित्यिक……….
माझ्या आत्याचे पती चतुरसथ प्रवचनकार श्री भगवानराव लहाने पाटील यांनी जर मला या आम्ही साहित्यिक ग्रुप वर जोडले नसते तर माझे लिखाण असेच अडगळीत पडले असते. पण आम्ही साहित्यिक ग्रुप मुळे वैशालीताई फाटक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी केले व नंतर दोन ई बुक मध्ये माझ्या दोन वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध झाल्या व मला मागच्या महिन्यात काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे पुणे साहित्य परिषद येथे ऊतकृषठ लेखक प्रमाण पत्र तिन पुस्तक एक पेन मिळाला.
— सुदाम भाऊसाहेब शिंदे
मु पो ता वैजापूर
जि. औरंगाबाद
Sudam Bhausaheb Shinde
Leave a Reply