![default-photo-male](https://www.marathisrushti.com/mahacharcha/wp-content/uploads/sites/58/2019/08/default-photo-male.jpg)
या चर्चेत सहभागी होण्यासाठी सर्वात आधी साहित्य म्हणजे काय हे आपणास समजावुन घ्यायला हवे. आपली मराठी भाषा ही फार लवचिकता असलेली भाषा आहे साहित्य ह्या शब्दामधून बरेच अर्थ निघू शकतात जसे की काही वस्तू त्यांना आपण साहित्य म्हणून संबोधतो.
साहित्य या शब्दाची फोड करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे जे काही आशयपुर्ण व प्रयोजनासह लिखीत स्वरुपात आहे वा निर्माण केले आहे ते म्हणजे साहित्य. प्रयोजन हे दोन्ही स्वरूपात लिखाणाचे प्रयोजन व वाचनाचे प्रयोजन.
लिखाणाच्या प्रयोजनात अनेक स्फुट प्रकार पहायला मिळतील ऊदाहरणा दाखल ललित, ललितेईतर, काव्य, वास्तववादी, विद्रोही, विडंबनात्मक, इत्यादी.
वाचनाच्या प्रयोजनातही अनेक उद्देश पहायला मिळतील. अभ्यास, मनोरंजन, चिकित्सा, आवड, विनोद, टीका, व्यासंग इत्यादी प्रयोजन असू शकतात.
लेखक व वाचक आणी वाचक व लेखक हे एकमेकांशी पूरक आहेत कारण फक्त लेखक वा वाचक यांचे स्वतंत्र अस्तित्व असणे शक्य नाही. कारण वाचक व्हायला लिखाण व्हायला हवे, लेखक व्हायला वाचणारा कोणी तरी असायला हवा.
म्हणजे आपल्या ग्रुपवर कोणतेही आशयपुर्ण प्रयोजनात्मक लिखाण म्हणजे साहित्य व त्याची स्वकौशल्य वापरून निर्माण करणारा #साहित्यिक.
धन्यवाद #आम्ही_साहित्यिक ग्रुपचे या चर्चेच्या आयोजनासाठी.
— स्वलिखित: वि. र. महामुनी
V. R. Mahamuni
Leave a Reply