मनुष्य जन्मतो आणि त्याच्या मातृभाषेत तो बोलायला शिकतो. भाषा ही त्याला विचारांचे आदान प्रदान करायला उपयोगी ठरते. मेंदू ने मनुष्याला विचार
करण्याची शक्ती मिळते.आणि भाषा ही एकमेकांना विचार देण्या घेण्याचे माध्यम बनते. मग ती भाषा कुठली का असेना.
भाषेमुळे आपण ज्ञान मिळवितो. आईच्या कडून तान्हे असतांना शिकविलेली भाषा ती मातृभाषा समजली जाते.
आपल्या मराठी भाषेतील चोखा मेळा ,बहिणाबाई ,तुकाराम, नामदेव ,रामदास हे फार शिकलेले नव्हते पण जीवन कसे जगावे , काय वाईट, काय चांगले बद्दल चे त्यांचे विचार त्यांनी सामान्य जनतेला समजतील अशा भाषेत सांगून , लिहून ते व्यक्त झालेत. साहित्य म्हणजे प्रत्येकाच्या मनातील उचळंबून आलेल्या विचारांची मालिका, जी कथन करून वा लेखाणातून व्यक्त केलेली असते. तेव्हा या सा-या संताना त्या काळचे साहित्यिक म्हटले जातात . जसे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून जनतेला अमृततुल्य ज्ञान दिले. तसेच संतांनी संत वाणी जगासमोर मांडली . ह्या सा-या संतांनी मराठी भाषा समृध्द केली व ते त्या काळातील साहित्यिक झाले ठरले. .
पुढे जनतेने त्या साहित्याचे वाचन करुन स्वतःच्या ज्ञानात भर करुन , स्वतः नी साहित्याची सेवा केली, भर केली. जसे अभ्यास शिकणारा विद्यार्थी , कुठलाही खेळ शिकणारा खेळाडू , गायन शिकणारा गायक , वादन शिकणारा वादक .तसे साहित्य लिहीणारा -वाचणारा , विचार लिहून /बोलून व्यक्त होणारा साहित्यिक .मग भले त्याच्या वैचारिक वा त्याच्या बुद्धी प्रमाणे तो साहित्य लिहीण्याचा प्रयत्न करतो-लिहीतो. पण तो साहित्यिक तर खराच ना .!
कुठल्याही कलाक्षेत्रात निपुणता मिळवणारा अथवा निपुणते साठी प्रयत्न करणारा त्या त्या क्षेत्राचा विद्यार्थी वा कलेच्छु असतोच ना.
मी तर म्हणेन आपल्या साहित्यिक ग्रुपचे सारे सदस्य मग ते वाचक असो वा लेखन करणारे ते पण साहित्यिक .भले रोज लिखाण करणारे असोत वा नसोत. पण दुस-यांचे लिखाण वाचून त्यांच्या ज्ञानात भर होते वा आनंद मिळवतात.व वाचल्यावर त्यांचे स्वतः चे विचार व्यक्त करतात अथवा न आवडल्यास त्या लिखाणाचे टीकात्मक टिपण करतात. चिकित्सा करण्यास मुद्दे सुद प्रत्युत्तर मांडतात . तर काही जण लिखाणाचे मनन, चिंतन , विवचन करतात ते सारे साहित्यिक मधे गणले जातात. जेव्हा वाचनात गोडी असते रुची असते तेव्हाच त्या
लेखनाचे वाचन घडते. म्हणजे साहित्याचा अंश असतोच ना.
असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो साहित्यिक . साहित्याची आवड असणारा , साहित्याची कुठल्याही प्रकारे जतन व वृध्दी करणारा हा साहित्यिक च होय.
— वैशाली वर्तक
Vaishali Vartak
Leave a Reply