कसं होतं पुर्वी साहित्यिक म्हणजे एकदम हुशार ,दैवी देणगी असलेला,शब्द व मराठी व्याकरणावर पकड असणारा , भरपूर वाचन असलेला असा असायचा. किमान तशी अपेक्षा असायची.
आता व्याख्या बदलली आहे.कोणतीही व्यक्ती उस्फुर्तपणे एखादा प्रसंग ,आठवण, कथा कवीता लिहू शकत असेल आणि तिच्या साहित्याचे कौतुक होत असेल तर तिला साहित्यिक म्हणायला हरकत नाही. त्यासाठी प्रस्थापित नियम लावालयाच हवा असे नाही.
मराठी व्याकरण बर्यापैकी किचकट आहे तेव्हा नवीन साहित्यिकांनी त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. खरेतर प्रस्थापितांनी टाकलेल्या या बेड्या आहेत,एखाद्या शब्दात वेलांटी पहिलीच्या ऐवजी दुसरी लिहिली गेली तर काही आभाळ कोसळणार नाही. मी स्वतःला साहित्यिक मानत नाही पण व्याकरणाची फारशी फिकीर करत नाही .
ह्या गृपवर खूप जण लिहितात. छान लिहितात. मला तर वाटते जे वाचनीय आहे ते साहित्य . आणि जे तसे लिहू शकतात ते साहित्यिक …..
— विवेक वैद्य
Vivek Vaidya
Leave a Reply