महाचर्चा* या सदरात *साहित्यिक कोण ?* यावर वेगवेगळे लेख वाचनात आले. एक वाचक म्हणून यातील लेखकांचं अभिनंदन करावं यासाठी ही पोस्ट.
या लेखात प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून आपापली मते मांडली होती. विषय एकच आणि त्यावरची मते मात्र भिन्न. वेगवेगळेपण वाचताना खूप मस्त वाटलं. विशेष म्हणजे माझ्या नजरेखाली जेवढे लेख आले त्यात क्वचित एखादी टाईप मिस्टेक असू शकते पण अशुध्द लेखन आढळलं नाही.त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित झाला.
-हस्व, दीर्घ, योग्य. णच्या जागी णच आणि नच्या जागी नच असेल तर वाचताना वाचकाला वाचनाचा आनंद मिळतो. (असं मला मी *वाचक* म्हणून वाटतं. )
कदाचित काही जण असंही म्हणतील की, लेखन अशुध्द असेल तर शुध्द समजून वाचा. पण कसं असतं ना, आपण जेवत असताना प्रत्येक घासागणिक जर खडा किंवा कच दाताखाली आली तर जेवणाचा रसभंग होतो. तसंच या अशुध्द लेखनाने (माझ्या सारख्या )वाचकांचा रसभंग होतो. म्हणून शुद्ध लेखनाचा अट्टाहास.
मला पुन्हा एकदा सर्व लेख नजरेखाली घालायचे आहेत. काही लेखातील काही मुद्दे मला (बुध्दीला)जरी पटले नसले तरी लेख सर्वांचेच वाचनीय होते.प्रत्येकाची सारासार विचार करण्याची विचारशक्ती वेगळी असते . तो त्यानुरूप लिहित असतो. या सगळ्यांच्या लेखातून जर सार काढलं तर *साहित्यिक कोण* याचं खरं उत्तर नक्कीच सापडेल.
आम्ही साहित्यिकवर ज्यांचे लेख वाचायला मिळाले त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा……
— वृषाली जोगळेकर
Vrushali Joglekar
Leave a Reply