प्रिय पत्र,
पत्रास कारण की, तुझी खूप आतुरतेने वाट पहायचोआम्ही लहानपणी सर्वजण. तुझं येणं सोबत घेऊन यायचं जीवनात आनंदाचे सुखद क्षण!
मनीची भावना फक्त तुझ्यामुळेच व्यक्त होत होती. सुखरुप असल्याची बातमीही तुझ्यामुळेच मिळत होती. नोकरीची बातमीही तूच तर आणायचास , समारंभाचे संदेशही तूच तर पोहोचवायचास…… मोबाईल टेक्नॉलॉजीच्या दुनियेत खूप मिस करतोय. आज पोहोचत असतील संदेश क्षणात जरी तुझी वाट पहाण्याचे ते क्षण मात्र हरवून बसलोय.
तुझीच तनू
— तनुजा इंगळे महाजन
Tanuja Ingale Mahajan
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4114421268574257/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/tanuja.mahajan.75?
Leave a Reply