विदर्भ-मराठवाडा या भागात अनेक तेलगू भाषिक कुटुंबे आंध्रप्रदेशातून, अनेक पिढ्यापूर्वी महाराष्ट्रात आली आणि स्थायिक झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीशी समरस झाली. आता त्यांची मातृभाषा मराठीच झाली आहे.
वार हा कर किंवा वाले या प्रत्ययार्थाने जोडलेली आडनावे नागपूर विदर्भाकडे भरपूर आहेत. हेडगेवार, कन्नमवार हे त्यातलेच. लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले. महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशात स्थयिक झालेली मराठी मंडळी तेलगूभाषिक झालीत. तेथे सामावलेल्या केतकर आडनावाच्या काही कुटुंबांनी केतवार हे आडनाव धारण केले आहे.
नमस्कार.
‘वार’ आडनांवांबद्दलची माहिती interesting आहे.
#त्यातील आणखी एक आडनांव म्हणजे ‘द्वादशीवार’. सुरेश द्वादशीवार हे लोकसत्ताच्या नागपुर Erition चे भुतपूर्व संपादक. ते अनेक वर्षें विदर्भ साहित्या संघाशीही निगडित आहेत.
# ‘वार’ आडनांवें असलेले लोक वेगवेगळ्या जातींमधील आहेत. ( ‘वार’ चा स्दथानाशी संबंध आहे, जातीशी नाहीं, हें आपल्या लेखावरून स्पष्टच आहे). माजी मुख्यमंत्री कन्नवार यांच्याबद्दल सार्यांनाच माहीत आहे. पण ‘अणे’ हे उच्चजातीय आहेत, यात शंकाच नाहीं. सुरेश द्दादशीवार ब्राह्मण आहेत.
हे उल्लेख करण्याचें कारण जातींची उच्च-नीचता दाखविणें हा नसून, across जाती, हा phenomenon दिसून येतो, याचा उल्लेख करणें , एवढाच आहे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक