निवासदर्शक आडनावं रूढ होणं ही जगभराच्या आडनावांची प्रथा आहे.
अँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), नरप्राण्यांच्या वीर्यातील शुक्राणू वगैरे अती लहान घटक प्रथमच पाहिले.
लेवेनहूक हे आडनाव, मराठीतील गुळदगड या आडनावाप्रमाणं, निवासदर्शक आडनाव आहे.
लेवेनहूक हे कुटुंब, हॉलंडमधील डेल्ट या गावी, लेवेनपोर्ट (Leeuwenport) या छोट्याशा रस्त्याच्या कोपर्यावर रहात असे. डच भाषेत Leeuw म्हणजे सिंह, enport म्हणजे फाटक आणि हूक (hock) म्हणजे कोपरा. म्हणूनच या आडनावाचा अर्थ … लायनगेट या रस्त्याच्या कोपर्यावर राहणारं कुटुंब.
— गजानन वामनाचार्य
रविवार 9 ऑगस्ट 2015.
Leave a Reply