रेळेकर, (डॉ.) सुवर्णा राजन

वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करुन अनेक वर्षे ठाणेकरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणार्‍या डॉ. सौ सुवर्णा रेळेकर.एम.बी.बी.एस. ची पदवी संपादन केल्यानंतर के.ई.एम. हॉस्पिटल, परळ येथे वैद्यकीय प्रशिक्षण व अधिव्याख्याता ही पदे डॉ. रेळेकर यांनी भूषवली. १९९२ पासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी व १९९७ पासून पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या सेवेत रुजू आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या वैद्यकीय सेवेमार्फत गरजू रुग्णांच्या सेवेबरोबरच वैद्यकीय शिक्षण व परीक्षक या नात्याने भावी डॉक्टर घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*