दिलीप कुलकर्णी यांचे नाव प्रकाशझोतात आले, ते त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पर्यावरण साहित्यसंमेलनामुळे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे महाराष्ट्रातील सर्वच पर्यावरणप्रेमींनी, समाजसेवकांनी, साहित्यीकांनी व कलाप्रेमी रसिकांनी जोरदार स्वागत केले. सभोवतालच्या पर्यावरणाशी सुसंगत मानवी जीवनशैली कशी असावी, पर्यावरण म्हणजे नेमके काय? पर्यावरणाचा आदर कसा राखता येईल, याची स्वत़ःपासून सुरुवात करुन समाजाला प्रभावित केले. पर्यावरणाशी सुसंगत असलेली व महात्मा गांधीजी व लॉरी बेकरले अश्या महापुरूषांकडून आचरली गेलेली जीवनपध्दती, ते अनेक वर्षे कोकणातील कुडावळे या छोट्याश्या गावी राहून अनुभवीत आहेत.
लहानपणापासून पुण्यात शहरी जीवन अनुभवूनही, तारूण्यात त्यांनी, कोकणामध्ये आपले उर्वरित आयुष्य, त्यांच्या लाडक्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी, वेचण्याचा धाडसी निर्णय घेतला. दिलीप कुलकर्णी यांनी पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असून त्यानंतर १९७८ ते १९८३ या काळात टेल्को या खासगी कंपनीमध्ये नोकरी केली.
Leave a Reply