सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावी झाला.
अतिशय ताकदीचा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांनी मिळवला होता.
शिक्षणानंतर नाटकात काम करण्याची इच्छा होती त्यामुळे साहजिकच मुंबईच्या दिशेने पावले निघाली व १७ वर्षे एका को-ऑपरेटीव्ह बँकेत काम केले. बँकेत काम करताना शौक म्हणून नाटकांत काम केले. मुंबईत त्यांना झुलवा हे नाटक मिळाले. “झुलवातील तृतीयपंथीयाची भूमिका त्यांनी मनापासून केली. ही भूमिका त्यांच्या “दरमियाँ” चा पाया होती.
दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी ‘ या चित्रपटाची निर्मिती आणि ‘ डँबीस ‘ या चित्रपटाची सहनिर्मिती केली. सयाजी शिंदे यांनी कधीच शॉर्ट फिल्ममध्ये काम केले नाही. परंतु शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची त्यांना इच्छा आहे. यांचे कारण कमी वेळेत चांगले संदेश देण्याचा या फिल्म योग्य मार्ग आहेत.
Leave a Reply