जन्म १९१३
मृत्यू २००३
भारतातील नामांकित वास्तुशास्त्रज्ञ. अहमदाबादचे हरिवल्लभदास हाऊस, कानपूर आयआयटी आणि वाचनालय, दिल्लीचे नॅशनल सायन्स सेंटर, नेहरू सायन्स सेंटर, स्विस ट्रेड मिशन, मेहसाण्याची नॅशनल डेअरी बोर्डाची इमारत, बांगला देशातील ढाक्याची नॅशनल लायब्ररी इत्यादी इमारती ह्या त्यांच्या वास्तुकलेचे नमूने आहेत. १९७९ साली ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष होते. २००६ साली त्यांना मलेशियन सरकारने मरणोत्तर पुरस्कार दिला तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply